मधुकर राणे अत्यंत सामान्य, मुंबईमध्ये एका चाळीत राहणारा मध्यमवर्गीय. याला दोन मुले, श्रीनिवास आणि दुर्गा. श्रीनिवासला क्रिकेटचे भयंकर वेड. त्या वेडापायी त्याला काहीच सुचत नाही. पण फक्त वेड असे म्हणता येणार नाही, तर त्याला क्रिकेट खेळणे खूपच छान जमत असते. जणू काही पुढील पिढीतील सचिन तेंडूलकरच. आईचे छत्र हरवलेली, दुर्गा एक हसरी आणि समजूतदार...